Friday, 8 May 2015

मोगरा...
स्टेशन वर "तो" मित्राची वाट पहात थांबला होता.नेहमीसारखीच  वर्दळ,गडबड-गोधळ.कोणी ट्रेन पकडण्यासाठी धडपडत होत ,कोणी फोनवर बोलत होत,बायकांची अखंड न थांबणारी  बडबड सुरु होती ,फेरीवाले,वडेवाले अधून मधून ये जा करत होते...प्रवास करून लोकलची गर्दी बाजूला सारून घामाघूम झालेला तो एका  बाकड्यावर बसला...
वाळवंटात अचानक पाऊस पडावा  ...तशी एक वाऱ्याची हळुवार झुळूक हळूच  त्याच्या अंगाला  स्पर्शून गेली,त्याचबरोबर सुंदर मोहक असा मोगऱ्याच्या  फुलाचा सुवास त्याचं अंग शहारून गेला...
.मोगऱ्याच आणि त्याचं एक वेगळच सख्य  होत.. 
आपसूकच त्याचे डोळे मिटले गेले आणि तो सुवास अंगा अंगात जसा जसा भिनत गेला तशी तशी, त्याच्या नेत्रपटलावर स्मृतींची चित्रे उमटू लागली....
"तो,ती आणि मोगरा हे समीकरणच झाल होत..बागेत हातात हात घेऊन बसताना Romantic होण्यासाठी  मोगऱ्याची केवढी साथ लाभे..."
एखाद  भांडण,वाद विवाद झाले कि ती उधारीच रुसण आणून फुगून बसायची..मग तिला मनविण्याचे एकमेव साधन म्हणजे गजरा...
"मोगऱ्याचा गजरा तिला कित्ती कित्ती आवडायचा... गजरा बघितला कि एखाद्या लहान मुलीसारखी आनंदाने फुलून जायची..
तीच उधारीच रागवण  गळून पडायचं आणि  लाजून हळूच त्याच्या कुशीत शिरायची..  
तो गजरा त्यानेच माळावा म्हणून हट्ट करायची..." 
गजरा माळताना तो गाण  गुणगुणायचा .."फिर छिडी रात,बात फुलोंकी "ती त्याला अधिकच बिलगून म्हणायची "सोन्या कित्ती रे गोड  गातोस आणि  Romantic  आहेस  तू" ..आणि छानस हसायची..तीच हसण बघताना.... तिची ती गालावर पडणारी चंद्रकोरीसारखी खळी बघताना त्याला काही सुचायचेच नाही...नक्की कोण सुंदर ती मोगऱ्याची फुलं कि  नाजूक,हसणारी ती?त्याला नेहमी प्रश्न पडायचा  त्याला ती खळी  स्वल्प्विरामासारखी वाटायची..म्हणजे बोलायचं खूप पण...शब्दच सुचायचे नाहीत तीच ते रूप न्याहाळताना..ती लाडात येऊन  नेहमी म्हणायची  काय चंद्र सूर्य ,निसर्ग ह्यांवर कविता करतोस?केली कधी माझ्यावर कविता..?त्याचं नेहमीच उत्तर असायचं .."तुला लिहायचं म्हटल म्हणजे शब्दच माझ्याशी भांडू लागतात ग .."
आत्ताही ती तशीच लाजत असेन,गजरा बघितल्यावर त्याच्या कुशीत शिरत असेन,पुन्हा चंद्रकोरी सारखी खळी आणि तसच हसत असेन ...फक्त गजरा माळणारा  तो तिचा "नवरा" असेन.....
डोक्यावर जोरात कोणीतरी मारलं आणि तो एकदम भानावर आला..तन्द्रीमधून...प्रवासाचा आलेल्या थकव्याचा मागमूसही न राहता तो अगदी शांत झाला होता. मागे बघितल तर त्याचा मित्र त्याला बोलवत होता...त्याने सहज आपली नजर पलीकडे वळविली आणि समोर  बघतो तर काय एक प्रेमी युगुल त्याला दिसलं ..ती त्याच्यावर  रुसलेली आणि तो तिला मनवीण्याचा  प्रयन्त करत होता आणि अचानक त्याने कागदाची पुडी उघडली आणि त्यांतून तसाच मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बाहेर काढला 
ती त्याला आनंदाने घट्ट बिलगून गेली ...त्यांचे ते रूप बघून "तो " गाल्यातल्या गालात  हसला त्याच्या मध्ये आपल  रूप बघत पाडगावकरांच्या ओळी नकळतच त्याची ओठी आल्या 
"प्रेम म्हणजे प्रेम,म्हणजे प्रेम असत 
जे तुमच आमच सेम  असत "....
हितेश २९फ़ेब २०१२

No comments:

Post a Comment