Tuesday, 15 September 2015

......ये कहा आ गये हम...........

हो शुरू हर पल ऐसे, हो शुरू हो दिन ऐसे अस म्हणत,म्हणत Instant कॉफीने आपल्या जीवनात घुसखोरी केली मग हळू हळू अख्ख जगच Instant होत गेल. हर हात में मोबाईल ,हर मोबाईल पे इंटर नेट..त्यामुळे सगळच पटापट- झटपट होऊ लागल..
मग त्यात भौतिक सुखाबरोबरच मानवी भाव भावनाही Instant होऊ लागल्या सगळच कस क्षणिक आणि तेवढ्यापुरत..चिरंतन अस काहीच नाही..
मग त्यात स्त्री पुरूषांच प्रेम संबंधही ..


"प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेल
जमिनीमध्ये उगवून सुद्धा आकाशापर्यंत पोहचलेल.. "


अस कवीवर्य कुसुमाग्रज जेव्हा म्हणतात तेव्हा त्या प्रेमाची व्याप्ती,खोली आणि त्यातील विशाल व्यापकता ..हे किती भिन्न होती..

प्रेम तुमच आमच जरी सेम असलं तरी त्यात वैश्विक प्रघल्भता अभिप्रेत होता...पण आता सगळच Instant असल्यावर प्रेमही चिरंतन थोडीच राहील..
आत्ताचे गाणे ऐकले कि अस वाटत हे कुठेतरी फक्त शारीरिकच पातळीवरच पोहोचलेले आहे 


१)तेन्नु में लव करता,बे मतलब करता.. बाहो में आ सोनीये ..बस आज रात के लिये ....
किवा

२)कभी मेरे साथ कोई रात गुजार तुझे सुभा तक मी करू प्यार
म्हणजे ह्या Instant  जमान्यात
प्रेमासारखी सुरेख तरल भावनाही मानसिक न राहता शारीरिक पातळीवरच राहिलेली आहे त्यातूनच प्रेम हे चिरंतन न राहता फक्त One Night Stand एवढीच व्याख्या झालेली आहे..


"नीज येत नाही मला एकटीला कोणी ना विचारी धरी हनुवटीला"


अस जरी नायिका आपल्या नायकाला म्हणत असली तरी त्यातली भावना कि हळुवार आणि तरल होती ..भडक अस काहीच नव्हत ..
पण हे ऐकून माझा एक मित्र हसायला लागला म्हणाला शेवटी एकूण एक झाल भावना तरल असो व भिभत्स शेवटी सगळ शरीरावर च्या सुखावारच आल..हे अस गाण म्हणजे घास सरळ तोंडात ना जाता मानेकडून तोंडाकडे न्यायाचा पण शेवटी तोंडातच जाणार ना ..मग हल्ली अस direct मागितलं तर काय बिघडलं ..कशाला पळ्याल लावत बसायचं..??


आता काय बोलणार ह्यावर नात्याची मजा ओरबाडण्यात नाही तर उलगडण्यात आहे हे कधी कळणार तुला ..
असो म्हणूनच ये कहा आ गये हम...
---------------------हितेश जकातदार (४जुन २०१४ 6pm )

Friday, 11 September 2015

होंत कधी-कधी असच
सगळ असुनही काही नसल्य़ागत  वाटत,
उदास मनात आठवणीच काहूर दाटत .

होंत कधी कधी असच
काही करावसच वाटत नाही,
माझ्या या पंखाना  भरारी घ्याविशीच वाटत नाही,

तर कधी खुप काही वाटत करावस,
पवनपुत्राप्रमाणे  सुर्याला वाटत गीळIवस,
काळIच्या  पल्ल्या आड़  दिक्कालाच्याही पुढच
वाटत बघावस,

होंत कधी कधी असच
होंत कधी कधी असच...
-------------हितेश
चहा आणि कॉफी 
चहा आणि कॉफी ह्या पेयांना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.
हे कोणी कसे निर्माण केले ह्याचा इतिहास जरी आपल्याला माहित  असला- नसला, तरी
चहा हा सर्वसामान्यांचा लाडका मुलगा तर कॉफी  हि श्रीमंतांची आणि कधी कधी सणावारासारखी  येणारी  नखरेल मुलगी आहे जणू..
कोणी कितीही म्हणो,कि "हो शुरू पल  ऐसे" तरी आपल्या दिवसाची सुरुवात हि चहानेच होते कॉफी ने नाही.
आपण जेव्हा मित्रांमध्ये गप्पा मारत असतो तेव्हा चहाच आपल्या  सोबत असतो..
गुलाबी थंडीत कुडकुडत असताना गरम गरम वाफाळलेला चहाच आपल्याला उब देतो 
पावसात ओलं चिंब भिजल्यावर कांदा भजी खाताना चहाची लज्जत निराळीच...
इतकच  काय तर..विध्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी रात्र रात्र जागण्यासाठी चहाच उपयोगात येतो ...
एघाद्या  लेखकाला,कवीला किवा संगीतकाराला काहीतरी नवीन सुचण्यासाठी चहाची केवढी मदत मिळते...
पण कॉफी च एकदम वेगळ आहे...
कधीतरी कातरवेळी "वाडकरांच "सुरमयी शाम " ऐकताना किवा मिलिंद  इंगळेच "गारवा  अथवा सांजगारवा" ऐकताना "तिच्या" आठवणीत रमून जाताना आपल्याला कॉफी जवळची वाटते.
मैत्रीणीला थांबण्याचा बहाणा म्हणून आपण चटकन ती भेटली कि तिला म्हणतो "चल एक कॉफी घायायची..?"म्हणूनच कोणा कवीला म्हणावस वाटत कि "तेरे संग एक सिम्पल सी  कॉफी भी किक देती है" अश्या ह्या एका  कॉफी मुळे कितीतरी प्रेम प्रकरण जुळले आहेत नाही..?
चहा असो व कॉफी  एक मात्र खर कि हे दोन्ही पेय आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत.
सो एनजॉय...बोथ ऑफ देम...
..............हितेश (२३/०३/२०१२..१:४२ pm )