चहा आणि कॉफी
चहा आणि कॉफी ह्या पेयांना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.
हे कोणी कसे निर्माण केले ह्याचा इतिहास जरी आपल्याला माहित असला- नसला, तरी
चहा हा सर्वसामान्यांचा लाडका मुलगा तर कॉफी हि श्रीमंतांची आणि कधी कधी सणावारासारखी येणारी नखरेल मुलगी आहे जणू..
कोणी कितीही म्हणो,कि "हो शुरू पल ऐसे" तरी आपल्या दिवसाची सुरुवात हि चहानेच होते कॉफी ने नाही.
आपण जेव्हा मित्रांमध्ये गप्पा मारत असतो तेव्हा चहाच आपल्या सोबत असतो..
गुलाबी थंडीत कुडकुडत असताना गरम गरम वाफाळलेला चहाच आपल्याला उब देतो
पावसात ओलं चिंब भिजल्यावर कांदा भजी खाताना चहाची लज्जत निराळीच...
इतकच काय तर..विध्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी रात्र रात्र जागण्यासाठी चहाच उपयोगात येतो ...
एघाद्या लेखकाला,कवीला किवा संगीतकाराला काहीतरी नवीन सुचण्यासाठी चहाची केवढी मदत मिळते...
पण कॉफी च एकदम वेगळ आहे...
कधीतरी कातरवेळी "वाडकरांच
"सुरमयी शाम " ऐकताना किवा मिलिंद इंगळेच "गारवा अथवा सांजगारवा" ऐकताना
"तिच्या" आठवणीत रमून जाताना आपल्याला कॉफी जवळची वाटते.
मैत्रीणीला थांबण्याचा बहाणा म्हणून आपण चटकन ती भेटली कि तिला म्हणतो
"चल एक कॉफी घायायची..?"म्हणूनच कोणा कवीला म्हणावस वाटत कि "तेरे संग एक
सिम्पल सी कॉफी भी किक देती है" अश्या ह्या एका कॉफी मुळे कितीतरी प्रेम
प्रकरण जुळले आहेत नाही..?
चहा असो व कॉफी एक मात्र खर कि हे दोन्ही पेय आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत.
सो एनजॉय...बोथ ऑफ देम...
..............हि तेश (२३/०३/२०१२..१:४२ pm )
No comments:
Post a Comment